उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा सुरूये. योगी आज उद्योजक व चित्रपट सृष्टीतील लोकांच्या भेटी घेत आहेत.

मात्र योगी यांच्या दौऱ्याला शिवसेनेसह मनसेने विरोध केला आहे. चित्रपट सृष्टी व उद्योग राज्याबाहेर हलवण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना व मनसे दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत.

मनसेने मुंबईत मराठीत पोस्टर लावत योगी यांचं नाव न घेता त्यांना ठग असं म्हंटलं आहे.

या पोस्टर वर " कहा राजा भोज .. और कहा गंगू तेली .. कुठे महाराष्ट्राचं वैभव तर कुठे यूपीचं दारिद्र ..असं लिहिलंय.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे स्वागत करू मात्र महाराष्ट्रातील उद्योग हडपण्याचा डाव असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतलीये.
तर तसा प्रयत्न जरी झाला तर मनसैनिक ही रस्त्यावर उतरतील असा इशारा मनसे ने दिला आहे.
#yogiadityanath #uttarpradesh #versus #maharashtra #marathilanguage #businesses #hiddenagenda #speakfreely #expressyourself #news #sakal #Sakalnews #viralopinion #MarathiNews #marathinewsupdates #MaharashtraVsYog
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.